Posts

Showing posts with the label क्राईम न्यूज

केवळ दोनशे रुपयांच्‍या वादातून खून..

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : इचलकरंजी : केवळ  दोनशे रुपयांच्‍या वादातून येथील प्रताप कॉलनीत इचलकरंजी येथील गुंड योगेश हणमंत शिंदे (वय 28, मूळ गणेशनगर, इचलकरंजी, सध्या रा. मिरज) याचा दोघांनी खून केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी काही तासांतच सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) आणि प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. योगेश शिंदे हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर त्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असून तो कळंबा कारागृहात होता. कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरारी झाला होता. त्यानंतर तो मिरजेत प्रताप कॉलनीमधील एका खोलीत पत्नीसह राहत होता. दरम्यान, एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता. रेल्वेत भेळ विकणारा सलीम सय्यद आणि गोळ्या, शेंगदाणे विकणारा प्रकाश पवार हे दोघे योगेश याच्या शेजारी राहत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्याची ओळख झाली होती. या ओळखीतून तो हॉटेलमधील काम झाल्यानंतर प्रकाश याला रेल्वेत गोळ्या, शेंगदाणे विक्री करण्यासाठी पॅकिंगच