Posts

Showing posts with the label जिल्हा

ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्या टाकून झालेल्या सरपंच निवडीत शकुंतला ऐवळे यांच्या रुपाने भाजपला सरपंचपदाची पुन्हा एकदा लॉटरी लागली

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कडेगाव : चिखली (ता.कडेगाव)  जिल्हा (सांगली) ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्या टाकून झालेल्या सरपंच निवडीत शकुंतला ऐवळे यांच्या रुपाने भाजपला  सरपंचपदाची पुन्हा एकदा लॉटरी लागली.त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.तर काँग्रेसच्या गोटात मात्र नाराजीचे वातावरण पसरले. मागील काही दिवसांपूर्वी भाजप व काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी तत्कालीन भाजपच्या सरपंच रंजना शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता व तो  बहुमताने   मंजुर  ही केला होता.त्यामुळे सरपंच शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार काल शुक्रवारी (ता.17) पुन्हा चिठ्ठ्या टाकून सरपंच निवड करण्याचे ठरले. त्यानुसार सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या तीन व भाजपच्या एक अशा चार महिला सदस्यांच्या नावाच्या चार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.त्यामध्ये पुन्हा भाजपाच्या सदस्या शकुंतला ऐवळे यांची सरपंचपदी निवड झाली.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर काँग्रेसच्या गोटात मात्र नाराजी पसरली. सरपंचपदी शकुंतला ऐवळे य