जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत बनावट दारू बरोबरच महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी
अनेकवेळा कारवाई होऊन दारूच्या हेराफेरीची मालिका सुरूच आहे. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : नंदुरबार | जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत बनावट दारू बरोबरच महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. गेल्या दीड महिन्यात कोट्यावधी रुपयांची दारू पकडण्यात आली आहे. मात्र, या दारू तस्करीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कोणतीही यंत्रणा पोहोचत नसल्याने अनेकवेळा कारवाई होऊन दारूच्या हेराफेरीची मालिका सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर आहे. मध्यप्रदेशला लागूनच शहादा व धडगाव तालुका आहे. याच तालुक्याच्या हद्दीतून दारूने भरलेले मोठ मोठली वाहने रवाना होत असतात. धडगाव तालुका सातपुड्याच्या कुशीत वसला आहे. शिवाय या भागात रस्त्यांची सोय बर्यापैकी झाल्याने दारू तस्करीसाठी हा मार्ग सुकर बनला आहे. त्यामुळेच आतापर्यंत या भागातून दारू भरून जाणारी वाहने पकडली गेली आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे व मुंबई येथील भरारी पथकाने शहादा शहर तसेच त