Posts

Showing posts with the label नायगाव

लिंगायत समाजातील नूतन नगरसेवक व गुरुगौरव पुरस्कार प्राप्त बांधवांचा सत्कार -

Image
हुपरी समाचार :   नायगाव प्रतिनिधी : हानमंत चंदनकर   8767514650    वीरशैव लिंगायत समाजातील नूतन नगरसेवक व गुरुगौरव पुरस्कार प्राप्त बांधवाचा नायगाव शहरात विश्वनाथ अप्पा धोते यांच्या अध्यक्षतेखाली समाजाच्या वतीने नुकताच सत्कार करून आद्य जगद्गुरु श्री रेणुकाचार्य महास्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली.  शहरात रेणुकाचार्य महास्वामी जयंती व नूतन नगरसेवक आणि गुरु गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या समाज बांधवांचा सत्कार कार्यक्रमात विश्वनाथ आप्पा धोते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रारंभी जगद्गुरु रेणुकाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले असून यावेळी नाथोबा विद्यालय गडगा येथील बालाजी भोस्कर, जिल्हा परिषद शाळा मांजरम येथील त्र्यंबक स्वामी नांदगावकर, जिल्हा परिषद पाटोदा दयानंद रामराव खिंडे या गुरुगौरव पुरस्कार प्राप्त व नूतन नगरसेवक विठ्ठल अप्पा बेळगे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सत्कारमूर्ती व समाज बांधवांना सखोल मार्गदर्शन प्रसिद्ध कवी व्यंकट आणेराये यांनी केले. यावेळी सचिन धोते, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश आणेराये पहेलवान, विश्वनाथ बों