मत ही दान करण्याची वस्तू नाही तर तो जबाबदारीने बजावंण्याचा अधिकार आहे : प्रसाद कुलकर्णी
दैनिक हुपरी समाचार : रुकडी ता.२५ संसदीय लोकशाहीमध्ये खरे लोकसत्ताक राष्ट्र प्रस्थापित व विकसित होण्यासाठी निवडणूक मतदार केंद्रित असली पाहिजे. मत ही अतिशय विचारपूर्वक देण्याची बाब आहे. ती क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन अंधश्रद्धा, भूलथापा, आमिषे ,जात -धर्म या आधारावर देण्याची वस्तू नाही. तसेच मत ही दान करण्याची बाब नसून तो विचारपूर्वक बजावण्यासाठी राज्यघटनेने दिलेला महत्वाचा अधिकार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पाठोपाठ आपला लोकसत्ताक दिनही येत असतो. यातील अन्वयार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. हीच राष्ट्रीय मतदार दिनाची नवमतदार व सर्व मतदारांकडून अपेक्षा आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि ' प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या राजर्षी शाहू कला-वाणिज्य महाविद्यालय,रुकडीच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ' राष्ट्रीय मतदार दिन ' या विषयावर बोलत होते. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प