Posts

Showing posts with the label हातकणंगले

पुणे जिल्ह्यातील प्रद्युम्न कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

Image
दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हुपरी समाचार :   हातकणंगले :  पुणे जिल्ह्यातील प्रद्युम्न कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या व पोलिस अधिकारी लेले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात मातंग समाजावर तसेच दलित त्यांच्यावर सुवर्ण समाजाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण अतिशय गंभीर स्वरूपाने वाढले आहेत. याकडे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे गांभीर्याने घेत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. पुण्यामध्ये गोखलेनगर येथे मातंग समाजाच्या प्रद्युम्न कांबळे यांची प्रेमसंबंधातून मुलीच्या नातेवाईकांनी निर्घृण हत्या केली व मृतदेह रस्त्यावर फेकून दिला होता. सैराट चित्रपटासारखी घटना घडली असतानाही पोलिस प्रशासन गप्प आहेत. त्यामुळेच दलित महासंघ आला परत एकदा आक्रमकपणे मातंग समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. महाराष्ट्रात दलित व महिला सुरक्षित